भजनी मालिका
← भजनांकडे परत

नारदादी वैष्णवजन । नामेंजि पावले समाधान

naradadi vaishnavajan | namenji pavale samadhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नारदादी वैष्णवजन । नामेंजि पावले समाधान । नामें जगासी मंडन । नाम पावन सर्वांसी ॥१॥ लाहो करा राम नाम । वावुगा सांडा भवभ्रम । अवघा कुळधर्म । नामें जाण साधतो ॥२॥ नाम जपा दिननिशीं । आळस नका करुं मानसीं । एका जनार्दनीं सायासीं । नका पडूं दुजिया ॥३॥