भजनी मालिका

भजने

नामा म्हणे माते ऐक वो वचना । मी गेलों दर्शाना नागनाथा ॥१॥ आंवढया देउळीं जाहला संचार । पारुषला धीर या देहाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामा म्हणे माते परियेसी वचन । गुज मी सांगेन अंतरीचें ॥१॥ धरोनि माझी वृत्ति पाहें माझें सुख । मी सांगतों तें ऐक जननिये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामा म्हणे स्त्रिये अनुचित केलें । कां माझ्या शिणविलें विठोबाशी ॥१॥ निंदेच्याअ उत्तरीं निषेधिलें मज । वाटली त्या लाज मायबापा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामा हें वदतां डोळयां आलें पाणी । पडिला धरणीं देवापुढें ॥१॥ नामदेव स्थिती पाहून श्रीपती । विस्मित ते चित्तीं स्तब्ध जाले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामाचा उच्चार करितां कोण्ही हांसे । तयासी होतसे नरकवास ॥१॥ साबडे बोबडे गावोत भलते । परि ते सरते पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामाचा गजर गर्जे भीमातीर । महिमा साजे थोर तुज एका ॥१॥ सिद्धि सिद्धि दासी अंगन झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ती चारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामाचा धारक विष्णुरुप देख । वैकुंठीचें सुख रुळे पायीं ॥१॥ निराकार देव आकारासी आला । भक्तीं पैं स्थापिला नामरुपा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामाचा प्रताप काय सांगू वाचे । अक्षय सुखाचें स्थान दावी ॥१॥ नामाविण कांहीं नाहीं नाहीं सार । साधावें सस्त्वर भले नोहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामाचा प्रताप जाणवेना कोणा । समुद्रीं पाषाण तारियले ॥१॥ आवडीनें कोणी चिंतितां उल्हास । काय तो तयास उपेक्षील ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामाचा महिमा कोण जाणे सीमा । चतुर्मुख ब्रह्मा-नेणे कांहीं ॥१॥ संसारा आलिया हेचि आहे जोडी । अखंड घ्यावी गोडी हरिनामें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ॥१॥ नाम हेंचि कर्म नाम हेंचि धर्म । केशव हेंचि वर्म सांगितलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामाचिया बळें न भीऊं सर्वथा । कळिकाळाच्या माथा सोटे मारूं ॥ १ ॥ वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनी नाचो रंगीं ॥ २ ॥

रचनाकार: संत सावता

नामाचें चरित्र सदा अति गोड । तीर्थें काय चाड नाममात्रें ॥१॥ ऐसा दृढ मनीं करावा विचार । नाम परिकर कलियुगीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामाचें चिंतन श्रेष्ठ पैं साधन। जातील जळोनि महापापें ॥१॥ नलगे धूम्रपान पंचाग्निसाधन । करितां चिंतन हरी भेटे ॥ २॥

रचनाकार: संत सेना