भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचा उच्चार करितां कोण्ही हांसे । तयासी होतसे नरकवास

namacha uchchar karitan konhi hanse | tayasi hotase narakavas

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामाचा उच्चार करितां कोण्ही हांसे । तयासी होतसे नरकवास ॥१॥ साबडे बोबडे गावोत भलते । परि ते सरते पांडुरंगा ॥२॥ अभाविकनें मांडिला पसारा । तया नाहीं थारा उभयलोकीं ॥३॥ एकाजनार्दनीं भावाचें भजन । दंभाचें कारण नाहीं देवा ॥४॥