भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचा प्रताप काय सांगू वाचे । अक्षय सुखाचें स्थान दावी

namacha pratap kay sangu vache | akshay sukhachen sthan davi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामाचा प्रताप काय सांगू वाचे । अक्षय सुखाचें स्थान दावी ॥१॥ नामाविण कांहीं नाहीं नाहीं सार । साधावें सस्त्वर भले नोहे ॥२॥ अजामेळ पाहा आजन्म पातकीं । नामें गेला सेखीं वैकुंठासी ॥३॥ कुंटिणी जारिणी शुकामिसें गाय । वैकुंठासी जाय तत्क्षणीं ॥४॥ पाहा वाल्ह्या कोळी उफराट्या नामें । भविष्य संभ्रमें वाखाणिलेम ॥५॥ नामा म्हणे किती सांगावा निर्धार । साधन सोपारें नाम एक ॥६॥