भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचा प्रताप जाणवेना कोणा । समुद्रीं पाषाण तारियले

namacha pratap janavena kona | samudrin pashan tariyale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामाचा प्रताप जाणवेना कोणा । समुद्रीं पाषाण तारियले ॥१॥ आवडीनें कोणी चिंतितां उल्हास । काय तो तयास उपेक्षील ॥२॥ कुंटिणी ते नीच राव्यासाठीं नेली । वैकुंठीं ठेविली सन्निधची ॥३॥ अजामिळ खळ पुत्राचिया मिषें । उद्धरिलें त्यास दीनानाथें ॥४॥ नामा म्हणे ऐसें सांगों आतां किती । नामापाशीं मुक्ति उभी असे ॥५॥