भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामा स्वयेंपाक करुं बैसला । केशव श्वानरूपें आला

nama svayempak karun baisala | keshav shvanarupen ala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामा स्वयेंपाक करुं बैसला । केशव श्वानरूपें आला । रोटी घेऊनि पळाला । सर्वांभूतीं केशव ॥१॥ हातीं घेऊनि तुपाची वाटी । नामा लागला श्वानापाठीं । तूप घे गा जगजेठी । कोरडी रोटी कां खाशी ॥२॥ तंव श्वान हांसोनी बोलिले । नामया तुज कैसें कळलें । येरू म्हणे खेचरें उपदेशिलें । सर्वांभूतीं विठठल ॥३॥