भजनी मालिका

भजने

अहो कृपेच्या सागरा । अहो भक्तकरुणाकरा । भक्तमुक्तीच्या दातारा । जगदोध्दारा विठोजी ॥१॥ अहो त्रिविक्रमा वामना । रामा कृष्णा मधुसुदना । दशरथत्मजा रघुनंदना । दानवदमना मुरारि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अहो पंढरीराया विनवितों तुज । अखंड संतरज लागो मज ॥१॥ नामाची आवडी उच्चार हा कंठी । करी कृपा दृष्टी मजवरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥ धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा