भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो नारायणा । सांभाळावें आम्हां दीना

aho narayana | sambhalaven amhan dina

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहो नारायणा । सांभाळावें आम्हां दीना ॥१॥ आमुची राखावी ती लाज । परंपरा हेंचि काज ॥२॥ सांभाळावे ब्रीदावळी । करुणाकल्लोळीं दयाळ ॥३॥ एका जनार्दनीं शरण । करुणाकर पतितपावन ॥४॥