भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो जी विश्वंभरा । विनंती माझी परिसावी

aho ji vishvambhara | vinanti majhi parisavi

रचनाकार: संत बोधले · अभंग
अहो जी विश्वंभरा । विनंती माझी परिसावी । मज दिनावर कृपा करा । आपला म्हणोनी ॥१॥ कृपादृष्टी धरावे हाता । मज द्यावी ज्ञानमती । तुमचे नाम महिमान वर्णावया ॥ २॥ लक्ष चौऱ्यांसी जीव जनी । भोगिता कष्ट जाले यौवनी । काही पुण्याची सामुग्री घेऊनी । मनुष्ये देही आलो ॥३॥ आता येवूनिया मनुष्य देहासी । शरण जावे भगवंताशी । चुकवावया चौऱ्यांशी । काही प्रयत्न करावा ॥४॥ आता येवूनिया नरदेहासी । शरण जावे सदगुरुसी । सांगेल वचन जपा मानसी । सदा अहर्णिसी विसरु पडो ने देवा ॥५॥ सदगुरु सांग जे जे वचन । ते दृढ धरा विश्वास जाणा । मग तेचि पावाल खुण । परब्रह्माचि ॥६॥ सदगुरुचरणी धरुनिया आवडी । पाप करावी देस धडी । मग तेचि पावाल गोडी । परब्रम्हाचि ॥७॥ इतके जाणावयालागुनी । आपणा जवळच आहे. जाण । जव मळिन आहे मन । तव जवळी असता धन। न सापडे तयासी ॥८॥ सदगुरु वचनाचे घालुनी अंजन । मग दृष्टी पडेल ते कांचन । मग होईल समाधान कासयासी ॥९॥ मी मी म्हणती सत्य काये । ज्ञानदृष्टी परतोनी पाहे । हा तो मृत्तिकेचा देह । मुसी ओतिलास ॥१०॥ सकळ मृत्तिका सोंगे घेतली आणिक। जैसे पाहे रे कनक । नामे भिन्न अळंकाराचि ॥ ११॥ तैसे पाहे ऐक जीवन सरिता । आणिक होय जाणा । तैसे रामी रातली आहे मन । पाप केवी राहो सके ॥ १२॥ बोधला म्हणे हरि हे विवेकसिंधुची लहरी । परि कर्ता असे हरि तोचि देव ॥१३॥