भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो देवा गुणनिधाना । परिसा विज्ञापना माझी एक

aho deva gunanidhana | parisa vidnyapana majhi ek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहो देवा गुणनिधाना । परिसा विज्ञापना माझी एक ॥१॥ माझें मज आश्वासन । देखिल्या चरण तुमचे ॥२॥ हेंचि माझी करुणा करा । भक्ति अवधारा भोळी ते ॥३॥ शरण एका जनार्दनीं । माझा विनवणी परिसावी ॥४॥