भजनी मालिका

भजने

द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥१॥ गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

द्वारकेमाजीं श्रीकृष्ण । एकदा करी देवार्चन । उद्धवें कर जोडोन । केला प्रश्न श्रीकृष्णा ॥१॥ सर्व देवाचा तुं देव । ईश्वर न कळे तुझी माव । शिवणे सर्व ऋषी गणगंधर्व । परी तुं नाकळा सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी । पाऊलें सरळ गोमटी । बाळ सुर्यापरी ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग । मुर्ति सावळी सवेग । गाई गोप संवगडे लाग । मिळोनि सकळांसहित ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्वारकेहुनी विठु पंढरीये आला । नामयाचा पूर्वज दामशेटी वहिला ॥१॥ दामा आणि गोणाई नवसी विठूसी । पुत्र देईं आम्हां देवा भक्तराशी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्वेषाचिया ध्यानें हरीरूप झाले । भाव हारपले देहादिक ॥१॥ देहादिक कर्म अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

धणीवरी ध्यान करीं कांरे मना । या सुख निधाना विठोबाच्या ॥१॥ पंढरीये-तैसें सुख आहे त्याचे पायीं । अनुसरोनि राहीं एकवेळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन मानबळें नाठविसी देवा । अंतकाळीं तेव्हा कोण आहे ॥१॥ यमाचे ते दंद बैसतील माथां । मग तुज रक्षितां कोण आहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ