भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा

dvarapal vinanti kari | ubhe dvarin raula

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥१॥ आपुलिया शरणागता । वाहों चिंता नद्यावी ॥ध्रु.॥ वचना या चित्त द्यावें । असो ठावें तुम्हासी ॥२॥ तुका म्हणे कृपासिंधू । दीनबंधू केशवा ॥३॥