भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वीपोद्वीपींचे पक्षी मेरुतळवटीं उतरले

dvipodvipinche pakshi merutalavatin utarale

द्वीपोद्वीपींचे पक्षी मेरुतळवटीं उतरले । रत्न म्हणोनी त्या स्फ़टिका झेपावले ॥१॥ राजहंस ते भ्रमलें हो पाषाण चुंबिती । आडकलिया चाचू मग मागिल आठविती ॥२॥ एक श्रीकृष्ण तें विसरलें ऐसें ज्ञानदेव बोलें । मूर्खेसी संगती करितां शाहणे सिंतरलें ॥३॥