भजनी मालिका

भजने

देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों । पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगुळ झालों ॥१॥ आतां माझी करीं चिंता । दान देई भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देशीं परदेशीं जालों तुजविण । माझें समाधान कोण करी ॥१॥ चातक चकोरापरी पाहे वास । तूं कां गे उदास पांडुरंगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देशें काळें वर्तमानें । न धरीं संकोच कांही मनें । मी तो ऐसाचि हें शहाणे । जाणती सकळ सर्वद्रष्टे ॥१॥ तंव तो आला अकस्मात । नारदमुनी गात नाचत । वंदूनियां श्रीकृष्णनाथ । कीर्ति विर्णित कृष्णाची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देह अवसानीं काळाची तों संधी । पोहोंचली आधीं येवोनियां ॥१॥ कोण सोडवील तुजलागीं बापा । श्रीराम जपा लवलाही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देह अशाश्वत नाम हें शाश्वत । म्हणोनि विवादत श्रुति शास्त्रें ॥१॥ नाशिवंतासाठीं राननाम तुटी । ससाराची आटी करिती जन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें ॥१॥ येणें नांवें जाला मी माझ्याचा झाडा । मोह नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देह आहे तंव करारे धांवणी । शरण चक्रपाणी रिघा वेगीं ॥१॥ येर ते लटिके इष्टमित्र सखें । हे तंव पारीखे सर्व चोर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देह गेह कर्म सारुनी । शेजे पहुडली निज समाधानी । कृष्ण वेणु गीत ये श्रवणीं । वृत्ति उचलली भेटी लागुनी वो ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

देह जाईल तरी जावो राहील तरी राहो । दोराचिया सर्पा जिणें मरणें न वावो ॥१॥ आम्ही जिताची मेलों जिताची मेलों । मरोनियां जालों जीवेविण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ