भजनी मालिका
← भजनांकडे परत

देशें काळें वर्तमानें । न धरीं संकोच कांही मनें । मी तो ऐसाचि हें शहाणे । जाणती सकळ सर्वद्रष्टे

deshen kalen vartamanen | na dharin sankoch kanhi manen | mi to aisachi hen shahane | janati sakal sarvadrashte

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देशें काळें वर्तमानें । न धरीं संकोच कांही मनें । मी तो ऐसाचि हें शहाणे । जाणती सकळ सर्वद्रष्टे ॥१॥ तंव तो आला अकस्मात । नारदमुनी गात नाचत । वंदूनियां श्रीकृष्णनाथ । कीर्ति विर्णित कृष्णाची ॥२॥ म्हणे उध्दरिलें विमलार्जुन । शापदग्ध हे कुबेरनंदन । भविष्य जाणोनियां दर्शन । घ्यावया तुझें पातलों ॥३॥ परात्पर तूं परत्पर तूं परमानंद । योगी हत्कमळींचा मकरंद । सगुणरुपियां सच्चिदानंद । यशोदेअंकी क्रीडसी ॥४॥ स्तवितां तूतें भागल्या श्रुती । मग त्या ठेलिया निवांती । त्या गापिकारुपें गोकुळा येती । तुजसी अंगसंग करावया ॥५॥ मग नमुनी यशोदेप्रती । म्हणे तूं वों भाग्यवंती । परमात्मा हा विश्रवतोमूर्ती । तुझिये अंकीं विराजला ॥६॥ निळा म्हणे वदोनी ऐसें । नारद गेला निज उददेशें । यशोदा ऐकोनियां निज मानसें । परम संतोष पावली ॥७॥