भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह ऐसें वोखटें । पृथ्वीमाजीं नाहीं कोठें

deh aisen vokhaten | pruthvimajin nahin kothen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह ऐसें वोखटें । पृथ्वीमाजीं नाहीं कोठें ॥१॥ वोखटें म्हणोनि त्यागावें । मोक्ष सुखार्थ नागवावें ॥२॥ जैसें भाडियाचें घोडें । दिनु सरल्या पंथ मोडे ॥३॥ हेतु ठेवूनि परमार्था । एका जनार्दनीं ठेवीं माथा ॥४॥