भजनी मालिका
← भजनांकडे परत

देशाविरहित काळासी अतीत । ते देवभक्त पंढरीये

deshavirahit kalasi atit | te devabhakta pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देशाविरहित काळासी अतीत । ते देवभक्त पंढरीये ॥१॥ जाऊनियां कोणी पहा । देवाधिदेव विठोबासी ॥२॥ जन्ममरणाचे तुटतील फांसे । पाहतां उल्हासें देवभक्तां ॥३॥ एका जनार्दनीं विटेवरी निधान । लेवुनी अंजन उघडें पहा हो ॥४॥