भजनी मालिका
← भजनांकडे परत

देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों । पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगुळ झालों

desh vesh navhe majha | sahaj phirat alon | karun satta kavanavari | kothen sthir rahilon | pay dole mhanatan majhe | tinhin kaisa mokalilon | paradeshin nahin koni | andh pangul jhalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों । पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगुळ झालों ॥१॥ आतां माझी करीं चिंता । दान देई भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥ चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय झालें। कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं । तुज धरूनि चित्तीं ॥२॥ भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा । लक्ष चौऱ्यांशी गांव । धरूनि राहिलों गा । हाचि वसता ठाव ॥३॥ भरवसा काय आतां । कोण आणि अवचिता । तैसी च झाली कीर्ति । तया मज बहुतां । म्हणउनि मारीं हाका । सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी । तूं चि कृपाळू दाता ॥४॥ संचित सांडवलें । कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया । तुटली हे लागावळी । निष्काम झालों देवा । होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥५॥