भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह आहे तुम्हां आधीन । तोंवरी करा भजन

deh ahe tumhan adhin | tonvari kara bhajan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह आहे तुम्हां आधीन । तोंवरी करा भजन ॥१॥ पडोनि जाईल शरीर । मग कराल विचार ॥२॥ यातना यमाची अपार । कोण तेथें सोडविणार ॥३॥ आला नाहीं अंगीं घाव । तंव भजा पंढरीराव ॥४॥ एका जनार्दनीं सांगे । वाउगे मागें नका जाऊं ॥५॥