भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह गेह चिंता । बाळासी नाठवे सर्वथा

deh geh chinta | balasi nathave sarvatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देह गेह चिंता । बाळासी नाठवे सर्वथा ॥१॥ न देखे तो दुजें स्थान । बाळका आपुले अंगीं जाण ॥२॥ माझें तुझें न म्हणे । उंच नीच कांहीं नेणें ॥३॥ एका जनार्दनीं अखंड । नाहीं तया वायां खंड ॥४॥