भजनी मालिका

भजने

त्रिपुटीं भेदूनी मनाच्या मौळी । तें आलें भूमंडळीं पंढरिये ॥१॥ नाम लाधलें नाम लाधलें पुंडलिकें केलें खेवणें देखा ॥२॥

त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें ॥१॥ मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदां हरी वाहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

त्रिपुटीविरहित कर कटीं उभा । त्रैलोक्याची शोभा शोभे गे माये ॥१॥ परे परता वैखरिये आरुता । पश्यंती निर्धारिता न कळें गे माये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥ गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरीं अवघा परमनंदुवो ॥ध्रु०॥

त्रिभंगी देहुडे उभे वृंदावनीं । वेणू चक्रपाणी वाज-वितो ॥१॥ तयावरी गायी टाकिताती माना । बाळें स्तनपाना विसरती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

त्रिभुवनाची परी मांडिली शरीरीं । गोकुळाभीतरीं उभारिलें ॥१॥ शेषाचीये द्दष्टी मूळ भूमिका चोखटी । तेथुनी मूळ सृष्टी आरंभिली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

त्रिभुवनापरती पंढरीये पेठ । उभा तो वैकुंठ विटेवरी ॥१॥ पहा चला जाऊं पंढरीये । नवस पुरती सये अंतरीचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिभुवनामाजीं चाले ज्याची सत्ता । म्हणे तत्त्वतां चोर आला ॥१॥ तयाचिया भेणें पळोनियां आलों । बोलतां हे बोल नवल चोज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिभुवनीं ज्याची सत्ता । लाज वाटे त्यासी गातां ॥१॥ म्हणा काया वाचा त्याचे दास । न करा आणि कांची आस ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ