भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनिंचे सुख पाहावया नयनीं

tribhuvaninche sukh pahavaya nayanin

त्रिभुवनिंचे सुख पाहावया नयनीं । दिनरात्रीं धणी न पुरे माझी ॥१॥ विटेवरी सांवळा पाहतां पैं डोळां । मन वेळोवेळां आठवितु ॥२॥ सागरीं भरीतें दाटे तैसें मन नटे । वाट पाहों कोठें तुझी रया ॥३॥ बापरखुमादेविवरु पूर्ण प्रकाशला । कुमुदिनी विकासला तैसें जालें ॥४॥