भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें

triputichya yogen | kanhin navhe konan jogen | ek jatan lagen | ek pathin lagaten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें ॥१॥ मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदां हरी वाहे ॥ध्रु.॥ पापपुण्यात्म्याच्या शक्ती । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती। तेथें सत्तानायेका ॥२॥ तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकाश निवडी । घातल्या सांगडी । तापे पेटीं हाकारी ॥३॥