भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनीं उदार । भोळा राजा श्रीशंकर

tribhuvanin udar | bhola raja shrishankar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिभुवनीं उदार । भोळा राजा श्रीशंकर ॥१॥ जे चिंती जया वासना । पुरवणें त्याची क्षणा ॥२॥ यातीं कुळ न पाहे कांहीं । वास कैलासीं त्या देई ॥३॥ एका जनार्दनीं सोपें । शिवनाम पवित्र जपें ॥४॥