भजनी मालिका

भजने

तुमच्या बळें नि:शंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम ॥१॥ कळिकाळ तोही वंदी माथा । तुमच्या शरणागता भिऊंनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुमच्याचि चरणाचा महिमा । नेणा तुम्ही पुरुषोत्तमा ॥१॥ आम्हा दासांचें जीवन । घडे अमृताचेचि पान ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुम्हां आम्हां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥१॥ माझें घोंगडें टाकुन देई । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हां आम्हां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥१॥ उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हां आम्हां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥ वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हां आम्हांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥ किती म्हणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हां होईल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥१॥ पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हांसाटीं आम्हां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥१॥ विचारा जी आतां ठायीचें हे देवा । आम्हां नये हेवा वाढवितां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हासांठी उणेपण । स्वयें मजलागुन येऊं द्या ॥१॥ प्रतिज्ञा तुमची न्यावी सिद्धि । मधीं उपाधी येऊ नेदी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुम्हांसी कारण पडलिया सांगा । नाम्याचे प्रसंगा सेवा तुमची ॥१॥ संदेह मनासी नका धरुं सर्वथा । माझी आण तत्वतां तुम्हांलागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ