भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्या संगतीचें काय सुख आम्हां

tumachya sangatichen kay sukh amhan

तुमच्या संगतीचें काय सुख आम्हां । तुम्हां मेघश्यामा न कळे कांहीं ॥१॥ हीनत्व आम्हांसी हीनत्व आम्हांसी । हीनत्व आम्हांसी देवराया ॥२॥ गोड कधी न निळेचि अन्नें । सदा लाजीरवाणें जगामध्यें ॥३॥ तुम्हांसी आनंद सुखाचा सोहळा । आमुचे कपाळा वोखटपण ॥४॥ चोखियाचा म्हणे कर्ममेळा देवा । हाचि आमुचा ठेवा भागाभाग ॥५॥