भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हां होईल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें

tumhan hoil deva padila visar | ahmin ten uttar yatna kelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्हां होईल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥१॥ पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥ आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन ते ॥२॥ तुका म्हणे देह देईन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥३॥