भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हांलागीं हरिहर । येती सत्वर अलंकापुरी

tumhanlagin harihar | yeti satvar alankapuri

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हांलागीं हरिहर । येती सत्वर अलंकापुरी ॥१॥ ऐशी थोरी तुमची देवा । न कळे अनुभवावांचूनि ॥२॥ माझे चित्त समाधान । जाहलें ध्यान धरितांचि ॥३॥ आठवी तुमचे गुण । जाहलें खंडन जन्ममृत्यु ॥४॥ वारंवार क्षणाक्षणा । माथा चरणां तुमचिया ॥५॥ भाकितों करुणा वचनीं । शरण एका जनार्दनीं ॥६॥