भजनी मालिका

भजने

ठेऊनियां भाव तुमचिये चरणीं । बैसेन श्रवणीं वैष्णव करितां कीर्तन ॥१॥ याचिपरी सार्थक हा करीन काळ । जाऊं नेदी निर्फळ ऐसें आयुष्य नरदेह ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ठेवाल तेथें राहेन सुखें । यावरी हरिखें आपुलिया ॥१॥ न वंची मी हे सेवेसी काया । धाडाल ठायां जाईन त्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ठेविला पाय माथा संतजनीं। तिन्हीं लोकी जाण सरता केला ॥१॥ घालीन लोटांगण वंदीन पाय माथा। पुरेल माझी इच्छा धणीवरी ॥२॥

रचनाकार: संत सेना

ठेवुनी भोंवताले रक्षणाला दूत । सांगतो तयातें सत्तारूपें ॥१॥ तुम्ही आतां याचें करावें रक्षण । व्याघ्र सिंह येणें बाधा नव्हे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥ आम्हांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ठेवूनियां हात गेला नारदमुनी । मंत्र ह्रदयभुवनीं प्रकाशला ॥१॥ उच्चार करितां त्रिभुवन ठेंगणें । विसरला मनें सापत्न दु:ख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे ॥१॥ धीर तूं गंभीर जीवन जगाचें । जळो विभागाचें आआहाचते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

डवरला गिरी कैलास ढवळा । सिंहासन ज्याला ढव-ळेची ॥१॥ पाहतां पाहतां निवाले लोचन । भव्य ज्याचें ध्यान एक-रूप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव