भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेविला पाय माथा संतजनीं। तिन्हीं लोकी जाण सरता केला

thevila pay matha santajanin| tinhin loki jan sarata kela

रचनाकार: संत सेना · अभंग
ठेविला पाय माथा संतजनीं। तिन्हीं लोकी जाण सरता केला ॥१॥ घालीन लोटांगण वंदीन पाय माथा। पुरेल माझी इच्छा धणीवरी ॥२॥ सेना म्हणे धन्य धन्य झालों देवा। न करितां सेवा भेटी दिली ॥३॥