भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेवुनी भोंवताले रक्षणाला दूत । सांगतो तयातें सत्तारूपें

thevuni bhonvatale rakshanala dut | sangato tayaten sattarupen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ठेवुनी भोंवताले रक्षणाला दूत । सांगतो तयातें सत्तारूपें ॥१॥ तुम्ही आतां याचें करावें रक्षण । व्याघ्र सिंह येणें बाधा नव्हे ॥२॥ क्षणाक्षणा मातें सांगावा वृत्तांत । वनीं भूत प्रेत हिंडताती ॥३॥ चोर हेर खळ रात्निचीये वेळे । रहावें भोंवताले सावधान ॥४॥ नामा म्हणे ऐसें सांगे त्या दुतांसी । आपण घरासी येता झाला ॥५॥