भजनी मालिका

भजने

चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंचि खापर काय होय ॥१॥ दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

चोरूनि खादलें दहीं दुध लोणी । जिहीं चक्रपाणि खेळविला ॥१॥ अखंड उन्मत्तें मतिमंद मूढें । गौळणीपाशीं रडे रूपें दावीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥ शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चोर्‍यांयशी लक्ष देहाप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥१॥ अवचट देह मनुष्य जन्म । तेथें साधावें परब्रह्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥ रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चौदा भुवनें वसे ज्याचे पोटीं । त्यासी आणी जेठी मारावया ॥१॥ इंद्रादि सुरवर जयाचे किंकर । त्यासी आणी पामर झोंबीसाठीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चौदाजणी ज्याच्या चरणातें पूजिती । त्याची घेईन माती आपुल्या शिरीं ॥१॥ एकांतीं अर्चन करिती धूर्जटी । त्यांसी बोलेन गोष्टी आवडीनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चौदाशें वरुषें शरीर केलें जतन । बोधाविण शिण वाढविला ॥१॥ नाहीं गुरुमंत्र नाहीं उपदेश । परमार्थासि दोष लावियेला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चौर्‍यांयशीं भोगितां । दुःख न सरे सर्वथा । संतसमागम घडतां । दुःख नासे तात्काळ ॥१॥ नको गुतूं या संसारीं । पडसी काळाचे आहारीं । संतसमागम धरी । तैं यातना चुकती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चौर्‍यांयशी लक्ष योनी फिरतां । अवचट नरदेह आला होतां ॥१॥ करीं याचें समाधान । वाचे गाई नारायण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चौर्‍यायंशी लक्ष योनी फिरे । परि मनीं सोय न धरे ॥१॥ दोचि अक्षरांचें काम । अधम नुच्चारी रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चौर्‍यांयशी लक्ष्‍ा योनीप्रती । फेरे खाती यातना ॥१॥ संकटापासूनि सोडविता । कोण हो होता देवावीण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा