भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंचि खापर काय होय

chorasi chandanen veshyesi sejar | parisenchi khapar kay hoy

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंचि खापर काय होय ॥१॥ दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥२॥ तुका म्हणे जरि पूर्वपुण्यें सिद्धि । तरि च राहे बुद्धी संतसंगीं ॥३॥