भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोरूनि खादलें दहीं दुध लोणी । जिहीं चक्रपाणि खेळविला

choruni khadalen dahin dudh loni | jihin chakrapani khelavila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चोरूनि खादलें दहीं दुध लोणी । जिहीं चक्रपाणि खेळविला ॥१॥ अखंड उन्मत्तें मतिमंद मूढें । गौळणीपाशीं रडे रूपें दावीं ॥२॥ शकुनीचा पुत्र शिवद्वेष करी । संकट मुरारी निवारिसी ॥३॥ उद्धरिल्या सर्व गोप गवळणी । लीला दाखवूनि नामा ह्मणे ॥४॥