भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोर्‍यांयशी लक्ष देहाप्रती । कोटी कोटी फेरे होती

chor‍yanyashi laksha dehaprati | koti koti phere hoti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चोर्‍यांयशी लक्ष देहाप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥१॥ अवचट देह मनुष्य जन्म । तेथें साधावें परब्रह्मा ॥२॥ जन्मोनियां मनुष्यदेहीं । परमार्थ साधिला तो नाहीं ॥३॥ सदा विषयीं अनुसंधान । भुले प्रपंचीं अनुदिन ॥४॥ तया नोहे संतभेटी । एकाजनर्दनीं जातां भेटी ॥५॥