भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो

choren choraten karava upadesh | apula abhyas asel to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥ शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥ तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥