भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौदा भुवनीं चौघां भुलविलें

chauda bhuvanin chaughan bhulavilen

चौदा भुवनीं चौघां भुलविलें । वेव्हार नासिले स्मृति व्यालीगे माये ॥१॥ अवघे धन देऊनी मज निधन केलें । ऋण मागावया धाडिलें नये ते ठायीं ॥२॥ ऐसें श्रीनिवृत्ति शब्दें । अगाध जालें । माझें मीपण गेलें धन देखा ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु साक्षी । तो मज पारखी घेऊनी गेला ॥४॥