भजनी मालिका

भजने

कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनियां ॥१॥ धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रम्ह तया अंगीं वसतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी । अपवित्र तियेसी म्हणों नये ॥१॥ काकविष्टेमाजी जन्मे तो पिंपळ । तया अमंगळ म्हणों नये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी । करें घेऊनि सावकासी । आतां बहु भितो यासी ॥१॥ आम्ही तुम्ही सवें जेवूं । गाई वळावया जाऊं । त्याच्या मानेवर बुक्या देऊं । जवळ जावयासि आतां भिऊं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृत त्रेता द्वापार कली । ऐसा चौ युगांचा मेळीं । तें महायुग शब्द आढळी । वेदांत शास्त्रीं ॥१॥ ऐसा ब्रह्मयाचा दिनां-तर । तैसीच रात्र एक सहस्त्र । तिसा दिवसांचा प्रखर । एक मास ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृतांताचे माथां देऊनियां पाय । वाचे नाम गाय अहर्निशीं ॥१॥ उघडा रे मंत्र उघडा रे मंत्र । शिव जपे स्तोत्र रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कृपणाचें धन असे भूमि आंत । तेथें जाय चित्त जेथें धन ॥१॥ ऐसी मज देवा लावावी हे सवे । हेंचि मज द्यावें पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृपा करोनि त्वां मज प्रसना व्हावें । आणि म्यां मागावें बुद्धिज्ञान ॥१॥ ऐसी भुली मज न घालीं पांडुरंगा । बिघड संत्संगा न करीं मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कृपा केली संतजनीं । लाविलों भजनीं श्रीहरीच्या ॥१॥ नाहीं तरी जातों वायां । लक्ष भोगावया चौर्‍यांयशीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कृपा झाली आता आली प्रत्ययासी कैसे या मनास करूं दादा ॥१॥ कैसे वज्रासन कैसे ते मनन इंद्रियांसी दमन कैसे करूं ॥२॥

रचनाकार: संत मुक्ताबाई

कृपाघनें वृष्टी केली । माझीं निवविलीं निजांगें ॥१॥ म्हणोनियां वारंवार । त्याचे उपकार आठवितों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा