भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृत त्रेता द्वापार कली । ऐसा चौ युगांचा मेळीं । तें महायुग शब्द आढळी । वेदांत शास्त्रीं

krut treta dvapar kali | aisa chau yugancha melin | ten mahayug shabda adhali | vedant shastrin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृत त्रेता द्वापार कली । ऐसा चौ युगांचा मेळीं । तें महायुग शब्द आढळी । वेदांत शास्त्रीं ॥१॥ ऐसा ब्रह्मयाचा दिनां-तर । तैसीच रात्र एक सहस्त्र । तिसा दिवसांचा प्रखर । एक मास ॥२॥ ऐसे बारा मास । त्याचें एक वरुष । शतभरी आयुष्य । ब्रह्म-याचें ॥३॥ ऐसा ब्रह्मयाचा दिनांत । शत वरुषें गणीत । ज्या प्र-ळयीं पोहत । मार्कंडेय उदकीं ॥४॥ ऐसीं अठ्ठावीस युगें जाण । पंढरपुरासी झालीं पूर्ण । जो कीं ब्रह्मयाचा दिन । प्रळय केला ॥५॥ नामा ह्मणे पंढरिची संख्या । सांगितली संत महंत लोकां । लक्षूनि पादुका । विठोबाच्या ॥६॥