भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी । अपवित्र तियेसी म्हणों नये

kushchal bhumivari ugavali tulasi | apavitra tiyesi mhanon naye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी । अपवित्र तियेसी म्हणों नये ॥१॥ काकविष्टेमाजी जन्मे तो पिंपळ । तया अमंगळ म्हणों नये ॥२॥ दासीचिया पुत्रा राज्यपद आलें । उपमा मागील देऊं नये ॥३॥ नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी । उपमा जातीची देऊं नये ॥४॥