भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनियां

kushal vakta navhe janiv to shrota | rahe bhav chitta dharoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनियां ॥१॥ धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रम्ह तया अंगीं वसतसे ॥ध्रु.॥ न धोवी तोंड न करी अंघोळी । जपे सदाकाळीं रामराम ॥२॥ जप तप ध्यान नेणे योग युक्ती । कृपाळु जो भूतीं दयावंत ॥३॥ तुका म्हणे होय जाणोनि नेणता । आवडे अनंता जीवाहूनि ॥४॥