भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपा उपजली जयराम स्वामीसी

krupa upajali jayaram svamisi

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
कृपा उपजली जयराम स्वामीसी । आले पाहायासी भाव माझा ॥ १ ॥ देखोनी तयासी आनंद वाटला । कंठ कोंदटला आनंदाने ॥ २ ॥ मनेंचि आरती केला नमस्कार । पूजिला साचार मनामाजीं ॥ ३ ॥ बहिणी म्हणे त्याचे मनांतील हेत । ओळखे निश्चित पांडुरंगा ॥ ४ ॥