भजनी मालिका

भजने

ऐकोनियां वाणी पातली ते रमा । बोलिली विश्रामा जीवाचिया ॥१॥ दुर्जनाचा भाव ऐसाचि वोखटा । दर्प त्याचा मोठा आवरेना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐकोनी कृष्णाचें बोलणे । उद्धव संतोषला तेणें । म्हणें कृपा करुनी मज दाखवणें । भक्तांचे मंदिर ॥१॥ मग धरुनी उद्धवाच्या हात । स्वयें दावी श्रीकृष्णानाथ । आणिकांसी नोहे तें प्राप्त । हरिभक्ताविण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐकोनी गजबजिली दैत्यसभा । धाकेंचि कंसही ठाकला उभा । तंव बीभत्सा माळभळभटाची शोभा । देखते झाले सकळही ॥१॥ नागवा उघडा आणि बोडका । जीवत्वपांगे बुडाली शंका । भोंवते देखताही विषयलोकां । म्हणे धांवा धांवा सोडवा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐकोनी दुधाची बोली । का मनीं निष्ठुरता केली । श्रियाळ सत्वें राखिली । नगरी नेली वैकुंठा ॥१॥ अंबऋषीच्या बोला । दाहीही अवतार नटला । माझे देखोनि उणिवाला । दूध कांहे न देसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐकोनी सीतेच्या उत्तरीं । पुर्णावस्था मंदोदरी । चढली स्वेदकंप शरीरी । आनंदलहरी दाटली ॥१॥ इंद्रिय विकळता जाली । चित्त चैतन्य मिठी पडली । अंतरी सुखोर्मी दाटई । तेणेंपडली मुर्छित ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐकोनीया शास्त्री रागेने बहुत मूर्ख म्हणतो शेतकरीस जाणा ||१|| नीळा बोले तेव्हा शाख शिकले तरी पुराण वाचले तरी जन्मभरी।।२।।

रचनाकार: संत विठाबाई

ऐक्य तें जालिया मीतूंपण नाहीं । गौरव हा कांहीं नाहीं नामीं ॥१॥ नाहीं चतुर्दल तुर्याही उन्मनीं । स्वयंभ ती खाणी उभी उसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐवजानिमित्त धोंड्यासी आणिलें । कोंडोनी घातिलें घरामाजीं ॥१॥ ऐकतांचि दामा क्रोधयुक्त जाहला । पुसे गोणाईला नाम्या कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐशा दोधीजणा एकविधं भावें । द्यायवासी जीव उभ्या ठेल्या ॥१॥ धन्य धन्य त्यांचा संसार सुफळ । सत्वाचेंचि बळ अंगामध्यें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐशा परि नमन माझें पंढरीनाथा । तूंचि होऊनि तुजमाजि झालों मी सरता ॥१॥ नये कळों कांहीं आतां एकानेक भाव । तुज माजीं मीहीं मजमाजि तूं सर्व ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐशा विचारें समाधान करीं । गोविंद श्रीहरी नारायन ॥१॥ सर्वकाळ ऐसी वदो ही वैखरी । आणि अंतरीं नाठवावें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव