भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशा विचारें समाधान करीं । गोविंद श्रीहरी नारायन

aisha vicharen samadhan karin | govind shrihari narayan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐशा विचारें समाधान करीं । गोविंद श्रीहरी नारायन ॥१॥ सर्वकाळ ऐसी वदो ही वैखरी । आणि अंतरीं नाठवावें ॥२॥ आणिकासी गुज न बोले वदन । वदो नारायन सर्वकाळ ॥३॥ रामकृष्ण माझ्या शेषाचें स्तवन । शास्त्रेंहि पुराणें भाट ज्यांचीं ॥४॥ नामा म्हणे आतां ऐसें करी देवा । ह्रदयीं केशवा राहे माझ्या ॥५॥