भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनी गजबजिली दैत्यसभा । धाकेंचि कंसही ठाकला उभा । तंव बीभत्सा माळभळभटाची शोभा । देखते झाले सकळही

aikoni gajabajili daityasabha | dhakenchi kansahi thakala ubha | tanv bibhatsa malabhalabhatachi shobha | dekhate jhale sakalahi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐकोनी गजबजिली दैत्यसभा । धाकेंचि कंसही ठाकला उभा । तंव बीभत्सा माळभळभटाची शोभा । देखते झाले सकळही ॥१॥ नागवा उघडा आणि बोडका । जीवत्वपांगे बुडाली शंका । भोंवते देखताही विषयलोकां । म्हणे धांवा धांवा सोडवा ॥२॥ पाटेचि पुरविली माझी पाटी । लक्षनुलक्ष आले कोटी । उठा उठा पळारे शेवटी । मारिले जाल व्यथेंची ॥३॥ दैत्य पाहाती चहूंकडे । शस्त्रपाणी वेधले हुडे । दुर्गा सांभाळिती चहूंकडे । म्हणती न दिसे विघ्न डोळियां ॥४॥ राजा म्हणे झांका त्यांसी । पुसा काय ते वार्तेसी । मग नसऊनियां वस्त्रासी । आणिला सभेवी पुसती ॥५॥ तो म्हणे राया बळिया बाळ । उपजला तो आमुचा काळ । विचित्र पाहतां त्याचा खेळ । लाविलीं पिढींची मज पाठीं ॥६॥ निळा म्हणे रुपाकृती । सुंदरपणाची ओतली मूर्ती । कोटी मदनाची अंगी दीप्ती । न ढळती पातीं अवलोकितां ॥७॥