भजनी मालिका

भजने

एक कीर्तन करितां पंढरीसी । सुकृताच्या राशी ब्रह्मा नेणें ॥१॥ संतसमागम टाळ घोळ नाद । ऐकतां गोविंद सुख पावे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक गांऊ आम्ही विठोबाचें नाम । सकळहि धाम मंगळाचें ॥१॥ इतर साधनें फळ काम देती । पुनरपी आणिती गर्भवसा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक गोक्षीर धाम धवळा । एक तो सहज मेघ सां-वळा । एक कंठीं रुंडमाळा । एक गळां वैजयंती ॥१॥ एक तो वृषारुढ जाण । एका साजे गरुडवाहन । एक स्मशानीं भस्मोद्धु-ळण । एका शयन क्षीरसागरीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एक गोप तेव्हां स्रियेसी सांगत । सांठवीं समस्त नवनीत ॥१॥ देवाचा नवस आहे पुरवणें । धरावें येथून अनसुट ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एक जोडी बहुतें खाती । भाग्यवंत म्हणती जन त्यासी ॥१॥ परि त्या आणिक साहित्यासी । नव्हे तैसी जोडी याची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक तत्व एकाकार सर्व देशीं । एक तो नेमेसी सकल जनीं ॥१॥ ऐसें ब्रह्म पहा आहे सर्व एक । नलगे विवेक करणें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एक तीन पांच मेळा पंचविसाचा । छत्तीस तत्वांचा मुळ हरि ॥१॥ कल्पना अविद्या तेणें झाला जीव । मायोपाधि शिव बोलिजे रवी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक ते एक एकासी कळेना । उगेचि कल्पना घेतीं वेडे ॥१॥ एकवांचुनी नाहीं एक सर्वां ठायीं । एकचि हृदयीं पुरें बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक तो गुरू दुसरा एक सद्गुरू सद्गुरूकृपेवाचुनि न कळे ज्ञानविचारू पारखी नेणती ज्ञानी ओळखती । गुरू केला परि ते नाहीं आत्मप्रचिति म्हणोनि वेगळा सद्गुरू निराळा ।

रचनाकार: संत रामदास

एक देशी आम्ही एकट एकले । आशेचे बांधले जन्मोजन्मीं ॥१॥ म्हणउनी इच्छुं तुमचा आश्रय । पाहविसे पाय वाटताती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक दोन असे करिती विचार । एकाचें अंतर एका न कळें ॥१॥ दोन ऐसें एक सर्वा ठायीं वसे । योगियां न दिसे एक दोन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एक दोन तीन विचार करती । परि न कळे गति त्रिवर्गातें ॥१॥ त्रिरूप सर्व हा मायेचा पसार । त्रिवर्ग साचार भरलें जग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ