भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक तत्व एकाकार सर्व देशीं । एक तो नेमेसी सकल जनीं

ek tatva ekakar sarva deshin | ek to nemesi sakal janin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक तत्व एकाकार सर्व देशीं । एक तो नेमेसी सकल जनीं ॥१॥ ऐसें ब्रह्म पहा आहे सर्व एक । नलगे विवेक करणें कांहीं ॥२॥ मिथ्या हें डंबर माया मथितार्थ । हरि हाची स्वार्थ वेगीं करी ॥३॥ नमा ह्मणे समर्थ बोलिला तो वेद । नाहीं भेदाभेद ब्रह्मपणीं ॥४॥