भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक दोन तीन विचार करती । परि न कळे गति त्रिवर्गातें

ek don tin vichar karati | pari na kale gati trivargaten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक दोन तीन विचार करती । परि न कळे गति त्रिवर्गातें ॥१॥ त्रिरूप सर्व हा मायेचा पसार । त्रिवर्ग साचार भरलें जग ॥२॥ त्रिगुणात्मक देह त्रिगुण भार आहे । त्रिमुर्ती सर्व होय कार्यकर्ता ॥३॥ एका जनार्दनीं त्रिगुणांवेगळा । आहे तो निराळा विटेवरी ॥४॥