भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक धरिला चित्तीं । आह्मीं रखुमाईचा पती

ek dharila chittin | ahmin rakhumaicha pati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक धरिला चित्तीं । आह्मीं रखुमाईचा पती ॥१॥ तेणें जालें अवघें काम । निवारला भवभ्रम ॥ध्रु.॥ परद्रव्य परनारी । जालीं विषाचिये परी ॥२॥ तुका म्हणे फार । नाहीं लागत व्यवहार ॥३॥