भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक धरलिया भाव । आपणचि होय देव

ek dharaliya bhav | apanachi hoy dev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक धरलिया भाव । आपणचि होय देव ॥१॥ नको आणीक सायास । जाय जिकडे देवभास ॥२॥ ध्यानीं मनीं शयनीं । देव पाहे जनीं वनीं ॥३॥ अवलोकी जिकडे । एका जनार्दना देव तिकडे ॥४॥